July 3, 2006

आनंदे नटली !

वृक्षांकडे पहा
गगनभरारी घेणा-या विहंगांकडे पहा
नभ आच्छादणा-या मेघांकडे पहा
अनंताच्या पोकळीत डोळे मिचकविणा-या ता-यांकडे पहा...

आणि जर तुम्हाला 'दृष्टी' असेल
तर तुम्हाला दिसेल
की या सा-यांचं आस्तित्वच आनंदमय आहे
प्रत्येकजण केवळ आनंदी आहे !

खरंतर वृक्षांना आनंदी असण्याचं कोणतं कारण आहे ?
ते ना पंतप्रधान बनणारेत, ना राष्ट्रपती
ना ते कधी श्रीमंत होणार आहेत
ना त्यांच्या गाठीशी कधी पुंजी साठणार आहे !

तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत,
पण ही उमललेली फुलं आनंदी आहेत.
खूप खूप आनंदी आहेत...

(स्वैर अनुवाद)
---
पांचगणीच्या ’शेरबागे’मध्ये वाचलेल्या या कवितेचा मी अनुवाद करण्याचा प्रयत्न केला होता. ती मूळ कविता आज येथे अपलोड करायला मुहूर्त सापडला !
७ सप्टेंबर ०९

8 Comments:

Anonymous Anonymous उवाच ...

आनंदाचे डोही आनंद तरंग...

आनंदासाठीच तर ही धडपड चालू आहे..कोठे थांबावे हे ज्याला कळतं तोच आनंदी...नाहीतर बाकी सगळे आमच्यासारखे कशा ना कशा मागे पळत असतात...शेवटी नक्की आनंद कशात आहे हेच कळेनासं होतं..

19.7.06  
Anonymous Shailesh उवाच ...

कविता अतिशय सुंदर आहे. अप्रतिम!

20.7.06  
Anonymous Ajay उवाच ...

Tu lihitos khoop chaan! Kahi posts vachun Mazya Punyanagritlya divsanchi athavan zahli..... Pune sodun 8 varshe zali :( .. Tasa me mulcha Punyacha naslya mule Bharat-visit madhe 1-2 divsan peksha jaasti rahaila hot nahi... pan tuze posts vachun Punyat gelya sarkha vatla :)

23.7.06  
Anonymous आदित्य उवाच ...

निखिल मित्रा हा आनंद शोधत राहाणं हेच खरं जगणं आहे. आपण जितका हा आनंद शोधू तितके सुखी राहू नाहितर सर्व व्यर्थ आहे गड्या.

24.7.06  
Anonymous Jayesh उवाच ...

Aaj baryach divsani maza RSS reader vachla, so kalala ki tu navin posts lihilya aahet. Khoop divsani marathi short stories vachlya. I always wonder how the authors think of such stories and moreover neatly put them in words.

Keep it up!

Cheers!

14.8.06  
Anonymous Akira उवाच ...

Nikhil,

Enjoyed this post. What is the name/author of the original?

He wactanna antarnaad madhlya shewatchya panawar yenarya kavitanchi athwan jhali...

15.8.06  
Anonymous Sandip उवाच ...

आरे काय? मला अस का वाटतय की तू प्रेमात बिमात पडलास? इतका आनंदी एकाच वेळी होतो माणसाला ;)

23.7.07  
Anonymous Sandip उवाच ...

आरे काय हे? मला असं का वाटतयं की तू प्रेमात बिमात पडलास? इतका आनंदी एकाच वेळी होतो माणसाला ;)

23.7.07  

Post a Comment

<< Home