फूल फुलताना ...
कारचे दार उघडून सागरने लॅपटॉपची बॅग आत ठेवली. सीटवर पाठ टेकून टायची गाठ सैल केली. उघड्या काचेतून थंड वारा लागला तेव्हा त्याला थोडेसे बरे वाटले. मनात विचारांचा कल्लोळ उठला होता. रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नल्स हिरवे-लाल रंग पालटत होते. पाय यांत्रिकपणे ब्रेक- ऍक्सिलरेटर ऑपरेट करत होते. गेल्या काही महिन्यांतल्या घटना डोळ्यासमोर चलतचित्राप्रमाणे सरकत होत्या...
वेगात आगेकूच करणा-या दुचाकी बाजारात कंपनीने नवी बाईक लॉंच केली होती. संपूर्ण युनिट एकच ध्यास घेऊन काम करत होते. माईलेज, पिक-अप, लुक्स, कंफर्ट - अनेक घटक विचारात घेऊन काम जोमाने चालले होते. या नव्या बाईकला मार्केटचा प्रतिसाद उत्तम मिळाला होता. वाढत्या स्पर्धेत टिकाव धरून कंपनीने अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवले होते. हे यश साजरे करायला कंपनीने एक मोठी पार्टी आयोजित केली होती आणि तिथेच बिनसले होते ! डायरेक्टरनी यशाचे गमक म्हणजे 'तरुणाईला खेचणारा' बाईकचा 'सेक्सी लुक' असल्याचे आवर्जून नमूद केले. केवळ संबंधित विभागाच्या प्रतिनिधींना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. सागरच्या युनिटमधे मात्र मोठीच निराशा पसरली होती. बहुतेक बाईकला वेग देणारे इंजिन असते, चाके असतात, हे टॉप मॅनेजमेंट विसरली असावी. 'कर्मण्येवाधिकारस्ते' प्रत्यक्षात उतरवणे किती कठीण आहे हे सागरला प्रथमच जाणवले ! विचारांच्या नादात गाडी घरापाशी आली तेव्हा सागर भानावर आला. ऑफिसच्या कटकटी उंबरठ्याबाहेरच सोडण्याचा तो नेहमी प्रयत्न करायचा...
दार उघडून नेहाने हसून त्याचे स्वागत केले.
लग्न होऊन पाच वर्षे झाली तरी प्रेम अजून ताजेतवाने होते.
'कसा काय गेला दिवस ?'
'झकास!'
'बाऽबाऽऽ' चिमुकल्या सायलीने गळ्यात इवलेसे हात टाकले.
'काय म्हणते आमची चिमणी' ? सागरने लाडाने सायलीच्या गालगुच्चा घेतला.
"A man travels the world in search of what he needs and returns home to find it" किती खरंय हे वाक्य, सागरला जाणवले !
'अरे दिवसभर तिची भुणभुण चाललीये, तिला बागेत घेऊन जातोस का?'
'जातो की. तेवढे चहाचे इंधन टाक आमच्या टाकीत म्हणजे निघालो!'
सागरचे बोट पकडून सायलीची स्वारी बागेत निघाली. बागेत तिला तिच्याएवढे छोटे दोस्त मिळाले. लहान मुलांना काय, मैत्री करताना 'सोशल स्टेटस, फायनान्शिअल बॅकग्राऊंड, प्रोफेशन' असल्या भिंती आड येत नाहीत - सागरच्या मनात विचार आला. गुलाबांच्या एका ताटव्यापाशी बसून तो मुलांची किलबिल पाहत राहिला...
तासभर बागडून झाल्यावर सायली बाबांकडे आली आणि 'दमले' असे म्हणून त्याच्या मांडीवर आसन जमवले. एवढ्यात तिच्या चंचल डोळ्यांना मागच्या ताटव्यातले सुंदर गुलाब दिसले. 'अय्या कित्ती सुंदर आहेत ही फुलं' ती आनंदाने चित्कारली. पण त्या 'सुंदर' या शब्दाने सागरचा मनातल्या चुकीच्या तारा छेडल्या गेल्या... सायलीला जवळ घेऊन तो म्हणाला,
'बेटा, गुलाबाची फुलं सुंदर आहेतच. ती सगळ्यांनाच आवडतात. पण फुलं पाहतेस तेव्हा त्या फुलांना आधार देणारे डेख पहा. ते काटेरी दिसते न? तरीसुद्धा. ते खोड पहा. तेही सुंदर दिसत नाही न ? पण फूल फुलायला तेही लागतात... झाडाला जीवनरस आणून देणारी मुळं ? ती तर बिचारी जमिनीत राहतात - आपलं तोंड कायमचं लपवून...ती तर दिसतही नाहीत. दिवसभर राबणारे माळ्याचे रापलेले हात सुंदर दिसत नाहीत. पण बाग फुलवायला लागणारं पाणी तेच शिंपतात... त्यांचंही कौतुक कर'
सायलीला समजलं नाही की बाबा आज हे काय बोलतायत ! तिच्या चिमुकल्या मेंदूत झालेला विचारांचा गुंता सागरने तिच्या डोळ्यांत वाचला आणि त्याला आपली चूक समजली ! चटकन हसून तिचे केस विसकटून तो म्हणाला,
'तुला नाही समजलं ? तू लहान आहेस अजून. मोठी झालीस की समजेल !!'.
मग स्वतःशीच हलकेच उद्गारला 'कदाचित समजेल. कदाचित नाहीसुद्धा ! तसंही सगळ्याच मोठ्यांना थोडीच समजतं हे !'

20 Comments:
अप्रतिम कथा - मला तर ही गद्यात लिहिलेली कविताच वाटतेय इतकी सुंदर झालीय!
निक, कथा फार छान आहे थोडक्यात खूप काहि सांगून जाते. मला त्यामागची भूमिका आणि संदर्भ फार चांगले लक्षात आले :) मोठं होणं आणि सगळं कळत असणं ह्यांचा तसा बादरायण संबंध आहे हे सुद्धा पटलं.
अत्यंत सुंदर कथा.
shailesh, aditya, alok ani 'nikone', thanks for your appreciation ! goshT aavaDli he aikun aanand jhaala.
खरंय..मोठं होताना किती बदलतो माणूस..क्रेडिट स्टिलींग पेक्षा इग्नोअर केल्याचं दुख: कमी नसतं...आपल्याला एकदम मनापासून आवडली आणि पटली ही कथा...
अमित
निखिल,कथा खुपच छान लिहीलीयं...
मनस्वी
अमित आणि मनस्वी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
निखिल, छान लिहितोस तू... पण त्यासाठी खूप दिवस वाट पहावी लागते...pls जरा frequency वाढव.
Fabulous post. Aprateem :)
Really really awsome...khupach sundar..post hi sundar aahe..aani lihinarahi.(tujhya postvarun inspire houn hi comment dili) ;-)
अरे बापरे, अभिजित, गुरूची विद्या गुरूलाच फळली :) thnx for the comment anyway ;)
Farach sundar ahe hi katha. Keep it up!
Hey Nikhil,
chan lihile ahes... baki blogs pan vachale tujhe...mast ahet..
Too good - Perfect Analogy ! You have a special vision to relate things in your personal and professional life. Katha wachun zakas watale :)
Nikhil...goshta awadali... :)
Paamar,
Faar sundar aani marmik aahe apli gosht..
Manapasun awadli...
Apratimach...!!
Sahaj eka mitrane hi lik mail keli, tevha pahavi mhantla tar atishay sundar likhan vachayala milala..
Asech chhan lihit raha..
Aabhaari,
Dhanwanti
खरे आहे....केलेल्या कामाचे चीज व्हावे, कौतुकाचे दोन शब्द कानी पडावेत, पाठीवर शाबासकीची थाप पडावी, इतकी प्रत्येकाची अपेक्षा असतेच....रास्त ही आहे....मनाची कळी खुलविण्यासाठी संजीवन हे़....पण अभाव ही सर्वात जास्त ह्याचाच आणी हीच साधी गोष्ट उमगत नाही सर्वाना.... खंत हीच!!!! आपला ब्लॉग वाचून खूप छान वाटले. आपल्या लिखाणातील सहजता भावली. आपल्या भावी ब्लॉग्सबाबत उत्कंठा आहे. नियमीत भेट देईन !!! आणी हो, माझ्या ही ब्लॉगला नक्की भेट द्या- www.gaurishevatekar.blogspot.com आपल्या प्रतिक्रिया वाचायला, स्वतःमधे बदल/ सुधारणा करायला निश्चितच आवडेल. नक्की भेट द्या !!!
फार म्हणजे फार म्हणाजे फारच सुंदर ! शब्दच नाहीत माझ्याकडे !! तुमचं दिसामाजी सुद्धा खूपच सुरेख आहे !!
मस्तच.
sunder
Post a Comment
<< Home