डायरी २००७
माझी एक सवय आहे. एखाद्या दिवशी मनात विचार डोकावतो - मागच्या वर्षी मी याच दिवशी काय करत होतो बरं ? कॅलेंडरची पानं मागे सरकवताना सुरम्य आठवणी साद घालतात आणि मग माझ्यातला पामर जागा होऊन पडसाद देतो...
तुम्ही म्हणाल हा पठ्ठ्या ब्लॉगवर बरचसं Nostalgia याच सदरातलं लिहितो का काय ! खरं आहे. त्याचं काय आहे की मी मुलखाचा आळशी आहे, त्यामुळे ’वर्तमाना’तल्या एखाद्या गोष्टीवर चार ओळी खरडायच्या ठरवल्या तरी त्या ब्लॉगवर प्रत्यक्ष उतरेपर्यंत त्यांचे अगदी वयस्कर ’भूत’ बनून ते मानगुटीवर बसते ! मग त्याची बाधा काढायला Nostalgia चा उतारा बरा पडतो :)
-------------------------
२८ एप्रिल
काल रात्री आई बाबांना विमानतळावर सोडून परत आलो. कालचा सगळा दिवस विलक्षण धावपळीचा होता. सकाळी उठल्यापासून पॅकिंगमधील बारीक सारीक राहिलेल्या गोष्टी, travel tips , आणि घरातल्या असंख्य गोष्टींबाबत आई बाबांच्या सूचना यात घड्याळाचा काटा कसा पुढे सरकत होता ते समजलेही नाही. लहानपणी मी किंवा अर्चना ट्रिपला जायला निघालो की आई बाबा असंख्य सूचना देत. आज मी त्यांना सूचना देत आहे :) पासपोर्ट कोणाला देऊ नका, विमानतळावर चुकू नका, उच्चार कळले नाहीत तर लिहून दाखवा, एकमेकांची चुकामूक होऊ देऊ नका, हे खा, ते खाऊ नका, इकडून फोन कार्ड घेऊन फोन करा, एअर होस्टेसला ’व्हेज’ असे दोन-तीनदा सांगा, विमानात पिक्चर असा पहा, कनेक्टिंग फ्लाईटला पुढच्या टर्मिनल वर तातडीने जाऊन बसा :) आई बाबा बिचारे सर्व सूचना मनापासून ऐकत होते !
चार वाजता इनोवा ने मुंबईला जायला निघालो. वाटेत फूड-मॉलमधे नेसकॅफे घ्यायला थांबलो. बरोबर एक महिन्याभरापूर्वी आई-बाबांच्या visa interview साठी मुंबईला जातानाही येथेच थांबलो होतो. तेव्हा मनावर दडपण होते visa मिळण्याचे. तेव्हा पुढचा विचारही डोक्यात नव्हता. visa मिळाल्यावर मात्र आता आई बाबा US ला जाणार याची एकदमच जाणीव झाली ! जणू आधी त्याची कल्पनाच नव्हती ! गाडीत फारसं बोलणं होत नव्हतं. काहीसं उदास वाटत होतं. गेल्या दोन महिन्यातलं एकेक चित्र डोळ्यासमोर येत होतं. अर्चनानं visa च्या कागदपत्रांचं पाठवलेलं मोठं पुडकं, checklist, interview साठीचे FAQs , घरात सारखी होणारी चर्चा, मुंबईला लॉजवर केलेला एक रात्रीचा मुक्काम, interview च्या आधीच्या संध्याकाळी मनाची बेचैनी घालवायला दादर परिसरात मारलेला फेरफटका, ’उडिपी’ मधली इडली, interview च्या प्रश्नांची तयारी, घोळात घोळ म्हणजे वाहतूक खात्याने गाडीच उचलून नेणे, मग टॅक्सीची धावपळ, कॉन्सुलेट बाहेर ची ती भली मोठी रांग, मुंबईचा तो असह्य करणारा दमट उकाडा, तिकडे अमेरिकेत रात्रभर जागत बसलेल्या अर्चनाचे दर अर्ध्या तासाने येणारे अधीरे फोन, एकदाचे interview चे घोडे गंगेत नाह्यल्यावर झालेला आनंद, मग येताना प्रभादेवी सिद्धिविनायकाचे दर्शन - प्रत्येक प्रसंग जणू काल घडल्यासारखा ...
एक्स्प्रेस हायवे संपला आणि वाहतूक जाणवायला लागली. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला लागल्यावर तर वाहने अक्षरश: मुंगीच्या वेगाने चालत होती. त्यातच रस्त्याच्या बाजूला एक विमान दिसले !! ड्रायव्हरने माहिती पुरवली की ते एक इमर्जन्सी लॅंडिंग केलेले विमान आहे ! आई बाबा पहिल्यांदाच इंटनॅशनल फ्लाईटने निघाले असताना त्यांना इमर्जन्सी लॅंडिंग ची केस दिसणे फारच अयोग्य होते :) मागाहून समजले की ड्रायव्हरने सांगितलेली माहिती चुकीची असून ते एक ’सेवानिवृत्त’ झालेले विमान होते आणि ट्रेलरवर घालून नेताना एका ’बोळात’ ट्रेलर चुकून घुसल्याने ते तेथेच अडकले होते :) विमानतळावर पोहोचेपर्यंतचा शेवटचा एक तास फार त्रासदायक गेला. प्रचंड गर्दी, सावकाश जाणारी वाहने आणि जोडीला कातर मन !
विमानतळावर पोहोचल्यावर मात्र तेथे जे एक प्रवासाचे उत्साही वातावरण असते त्यामुळे मनाची सगळी मरगळ झटकली गेली. लगेज चेक-इन, इमिग्रेशन फॉर्म भरणे इ. सोपस्कार मार्गी लागल्यावर आई बाबांशी थोड्या गप्पा झाल्या. एकमेकांना ’काळजी घ्यायला’ सांगण्याव्यतिरिक्त बोलायला फारसे काही सुचत नव्हते ! आईने त्या गडबडीत पण बनवून बरोबर घेतलेला शि-याचा डबा उघडला. पण खाण्याची भूक आणि इच्छा कोणालाच नव्हती ! एवढ्यात आई बाबांना त्यांच्याच फ्लाईटने सॅन फ्रान्सिस्कोला जाणारे श्री. जोगळेकर भेटले. आई बाबांना मुंबई ते थेट सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत सहप्रवासी मिळाल्याने जरा बरे वाटले. मुंबईचा विमानतळ आणि अमेरिकेतील मी पाहिलेले काही आंतरराष्ट्रीय विमानतळ यात एक मोठा फरक म्हणजे अमेरिकेत सिक्युरिटी चेक होईपर्यंत तुम्ही प्रवासाला निघालेल्यांना सोबत करू शकता. सामान वगैरे विमान कंपनीच्या ताब्यात एकदा दिले की मग आरामात कोठेही जाऊ शकता. मुंबई विमानतळावर मात्र आत गेल्या गेल्या तुम्हाला निराळे व्हावे लागते आणि प्रवासी आणि त्याचे आप्तेष्ट एका रेलिंगच्या पलीकडूनच एकमेकांशी बोलू शकतात. बहुधा विमानतळाची ही रचना करणारे अधिकारी पूर्वी तुरुंगात काम करत असावेत - अन्यथा कैद्यांना भेटायला जशी व्यवस्था असते तशीच व्यवस्था इथे पण असायचे काय कारण असेल ? :)
आई बाबांचा निरोप घेणे खूप जड गेले. कधी नव्हे ते आई बाबांच्या डोळ्यात पाणी पाहून मनाची चांगलीच कालवाकालव झाली. इमिग्रेशन काऊंटरच्या पलीकडे गेल्यावर आई बाबांनी हात केला आणि मग वळून दिसेनासे झाले. आता इथून पुढे चार सहा महिने भेट नाही. एकमेकांचा चेहरा पाहायचा नाही. घरी आल्यावर दार उघडायला कोणी येणार नाही. किंबहुना दारावरची बेलच वाजवायची नाही. ’आज मला यायला उशिर होईल’ असं सांगायचं नाही. ’जेवायला काय आहे ?’ असा ऑफिसमधून फोन करायचा नाही... सुन्न मनाने थोडा वेळ तिथेच थांबलो. मग स्वार्थी विचारांची गर्दी थोडी दूर झाल्यावर जाणवलं की दूर देशी जाऊन आई बाबांच्या मायेला अर्चना पारखी झाली आहे, तिला आता काही काळ तरी हे सुख मिळेल... मग काहीसं बरं वाटलं... काही महिन्यांपूर्वी जुहू चौपाटीला मोहिनीमावशीबरोबर गेलो असताना तिथे दर मिनिटाला आकाशात झेपावणारे विमान पाहून आई बाबांना ’तुम्हीही काही दिवसांत असेच US ला जाल’ असे चिडवलं होतं. बोलता बोलता आज चक्क ते विमानात बसून खरोखरच निघाले होते ! काहीसं स्वप्नवत वाटत होतं. मी आणि अर्चनाच्या मागे धावताना, आमची प्रत्येक गरज प्राधान्याने पुरी करताना आई बाबांनी कधी स्वत:च्या आवडीनिवडींची, करमणूक-मनोरंजनाची, पार्ट्या-सहलींची पर्वा केली नाही. आज त्यांच्या सगळ्या जबाबदा-या पूर्ण झाल्यावर त्यांनी आता तरी परदेश पहावा, अनुभवावा अशी आमची इच्छा आज पूर्ण होत होती...
टर्मिनल 2 C मधून बाहेर पडून मग कॅंटीनमधे गेलो. साडेबारा वाजता पुण्याची बस असल्याने कॅंटीनमधे खाणे पिणे आटोपून मग बस मधे येऊन बसलो. अर्चनाचा साडेबाराच्या सुमाराला फोन आला. तिच्याशी मनसोक्त बोललो. आई बाबांपासून दूर झाल्यावर अर्चनाशी गप्पा मारण्याइतका दुसरा रिलिफ कोणताच नसेल ! एक मोठी बहीण म्हणून जी काही जबाबदारी असेल त्यापेक्षा अर्चनाने माझ्यासाठी नेहमीच खूप काही अधिक केलं आहे... फोन ठेवल्यावर झोपायचा निष्फळ प्रयत्न केला. बसमध्ये A C विलक्षण थंड होतं. मधून मधून अस्वस्थ डुलकी लागत होती. फूड मॉलवर गाडी थांबली तेव्हा गरम वडापाव खाऊन जरा बरे वाटले. झोपेची वेळ बिनसली की मग भूक कधीही लागते !
सकाळी सहप्रवाशांच्या वादंगाने जाग आली ! पुणं जवळ आलं होतं आणि बस कोठून कोठे न्यायची आणि काय क्रमांकाने प्रवाशांना घरी सोडायचं यावरून प्रवासी आणि coordinator यांच्यात प्रेमळ संवाद चालला होता. Travelling Salesperson ला लाजवतील अशी समीकरणे मांडली जात होती :) मला सदाशिव पेठेत यायचे असल्याने कुठूनही कसेही गेलं तरी माझी पाळी मधेच येणार होती ! अर्चनाचा एक दोनदा पुन: फोन येऊन गेला. साडेसहाच्या सुमारास एकदाचा घरी पोहोचलो. झोपेचे झालेले खोबरं, बसमधली सीट फारशी आरामदायक नसल्याने पूर्णपणे अवघडलेलं शरीर आणि एकटेपणाची मधूनमधून होणारी जाणीव यांनी एक प्रकारचा बधिरपणा आला होता. यांत्रिकपणे कुलूप उघडून आत आलो. पेपरवर एक ओझरती नजर टाकली आणि पुन: निद्रादेवीच्या अधीन झालो.

2 Comments:
मस्तच लिहीले आहे! :)
गम्मत म्हणजे माझे आई बाबाही नोव्ह. मधे येतील सॅन फ्रॅन्सिस्कोला.. पण मी दुसर्या बाजुला , म्हणजे S.F ला असल्यामुळे आनंदी आहे..
असो..फार विचित्र वाटतं आई बाबा असे गावाला गेले की. सुरवातीला जरा वाईट वाटणं, आठवण येणं वगैरे. मग मधले दिवस एकदम धिंगाणा घालण्यात जातो.. मग परत परतीकडे वाट पाहात बसणं!! gone thru it.. njoy.. :)
likhan awadala! Baryacha diwasani lekh pahun anand zala!
Post a Comment
<< Home