-हस्व आणि दीर्घ
देवनागरी लिपीत -हस्व आणि दीर्घ उच्चारांसाठी इ/ईकार, उ/ऊकार तसंच अ आणि आ अशा स्वरांच्या जोड्या आहेत. देवनागरी लिपी वापरणा-या भाषांसाठी ही व्यवस्था पुरेशी आहे. परंतु इतर भाषांमधील - उदा. इंग्रजी - काही स्वर देवनागरीमधे लिहिता येत नाहीत. उदा. ’बॅंक’ मधील ’ऍ’ हा स्वर मूळ देवनागरीमधील नाही, पण मराठी लिहिताना अक्षराच्या डोक्यावर अर्धचंद्र लिहून त्याची ’व्यवस्था’ करण्यात आली आहे ! हिंदीत हाच शब्द ’बैंक’ होऊन येतो !
आज रामानंद आणि आशुतोषशी गप्पा मारताना रामानंद ने एक बाब माझ्या दृष्टोत्पत्तीस आणून दिली. ती म्हणजे मी Pest आणि Paste या शब्दांचा उच्चार एकाच पद्धतीने करतो, जे चुकीचे आहे.
’टूथ पेस्ट’ आणि ’पेस्ट कंट्रोल’ मधील ’पेस्ट’ वेगळी आहे ;) म्हणजे शब्द पण वेगळे आहेत - एक Paste आहे तर दुसरा Pest आहे. या दोन शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ तर निराळे आहेतच, पण त्यांच्या उच्चारातही फरक आहे. ’टूथ पेस्ट’ मधील Paste चा उच्चार दीर्घ आहे, तर ’पेस्ट कंट्रोल’ मधील Pest चा उच्चार -हस्व आहे. हे शब्द शिकवताना / वापरताना उच्चारांमधील या फरकाचा उल्लेख - किमान बहुसंख्य मराठी माध्यमाच्या शाळांत तरी - अजिबात होत नाही. तसंच हा फरक दाखविण्याची देवनागरी लिपीत पद्धत नाही. ’ए’ हा एकच स्वर असल्याने (इ आणि ई सारखी -हस्व-दीर्घाची जोडी नसल्याने) उच्चारांतला हा भेद, शब्द लिहिताना लोप पावतो.
यावर उपाय म्हणून एखाद्या नवीन स्वराचा लिपीत अंतर्भाव करता येईल,
अथवा ’टूथ पेऽस्ट’असा अवग्रह चिन्हाचा वापर करता येईल.
पेस्ट चे हे दोन उच्चार ऐकायचे असतील तर हे पहा -
http://dictionary.reference.com/browse/paste
[peyst]
आणि
http://dictionary.reference.com/browse/pest
[pest]
1 Comments:
कन्नडमध्ये तू म्हणतोस तसे एकारासाठी -हस्व आणि दीर्घ असे दोन स्वर आहेत, त्यामुळे paste व pest या दोन शब्दांच्या उच्चारातला फरक दाखवणे शक्य आहे. मराठीतही एक नवीन स्वर अंतर्भूत करायला काहीच हरकत नाही!
Post a Comment
<< Home