December 15, 2004

दोन सूर्य

माझ्या ललाटी परमेश्वराने दोन सूर्यांच्या तेजाने नाहून निघण्याचे भाग्य लिहिले... पैकी एका सूर्याच्या उदयाचा मी साक्षीदार होतो, तर माझा जन्म झाला तेव्हा दुसरा सूर्य दिव्य तेजाने माथ्यावर तळपत होता. आता एक सूर्य माथ्यावरून ढळला आहे, तर दुसरा पश्चिमेकडे कलला आहे. दोघांसही भारताचे प्रतिष्ठेचे पद्म पुरस्कार मिळाले आहेत. दोन्ही सूर्यांनी आपल्या तेजाने आपापल्या सूर्यमालांना उजळून टाकले आहे.

पहिला सूर्य आहे - सचिन तेंडुलकर. मी पाचवीत असताना सचिनची कारकीर्द सुरू झाली. या गुणी खेळाडूच्या नावावर किती विक्रम आहेत देव जाणे ! आपल्या विलक्षण आकर्षक, वेगवान खेळाने सचिनने क्रिकेट रसिकांची मने जिंकून घेतली. मागच्या विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धचा सामना आठवून अजूनही मान ताठ होते !
हल्ली मात्र त्याचा खेळ हा 'सचिन'चा खेळ राहिला नाही अशी टीका ऐकू येते. त्याच्या खेळाच्या शैलीत काहीसा फरक झाला आहे. हा बदल वयानुसार स्वाभाविकच आहे. पण प्रेक्षकांना ते मान्य नसावे ! त्याला दुखापतीनेही सतावले. परंतु या सर्वांवर मात करत त्याने नुकताच कसोटी शतकांचा विक्रम गाठला.

दुसरा सूर्य आहे - स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी.भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आपल्या गुणवत्ता आणि तपस्येच्या जोरावर अढळपद प्राप्त केलेला हा सुरांचा बादशहा !परवाच ५२ व्या 'सवाई गंधर्व' महोत्सवात त्यांचे गायन ऐकण्याचा योग आला. त्यांनीच लावलेल्या रोपट्याचे आज या महोत्सवरूपी वृक्षात रूपांतर झाले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांची एक अवघड शस्त्रक्रिया पार पडली. ८० वर्षांचा हा तपस्वी जेव्हा गायला बसला, तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले...
ते कसे गातात याच्याशी मला कर्तव्य नव्हते. ते गाताहेत, आणि मला त्यांचा प्रत्येक स्वर कानांत साठवून घ्यायचा आहे एवढेच मला माहीत होते. पहिली दहा मिनिटे झाली आणि पंडितजींचा स्वर लागला. बंदुकीच्या गोळीसारखा सणाणत जाणारा तो आवाज आज ऐशीव्या वर्षीही टिकून आहे. काही कौतुकाचे आणि आनंदाचे क्षण शब्दांत नीट वर्णन करता येत नाहीत. आनंदाश्रू ते काम उत्तम करतात !

या दोन्ही सूर्यांना माझा नम्र प्रणाम !

4 Comments:

Blogger Sandip उवाच ...

Kharach, aani he donhi surya marathi horizon madhun ugavale ya vichaarane mazi pan maan taTh hote... (horizon la marathit kaay manhayache visaralo bagh, aani to shabd aathave paryant aaj zop yenaar nahi).

paikee, sachin nawacha ha surya ajun prakhar whaychay ase nehmi watate, bhoLi apeksha ch mhanavi suryphula sarakhe tyachya kade nehmi laksh pahnarya aamha fans lokanchi... (aata fans la marathit kay mhanu bare...)

Aani Bhimsen Joshi... mi tyanna eikatanna chya romaancha chi kalpana karu shakto...

yanda S. Gandharva la na javu shakanyachi khant nehmi rahil...

17.12.04  
Blogger J Ramanand उवाच ...

Sandy, horizon == kshitij ??

19.12.04  
Blogger Sandip उवाच ...

JR,
true
Thanks ;-)

20.12.04  
Blogger Sonal उवाच ...

क्या बात है!! your writing skills are just too good!! Hats off to you.

8.6.07  

Post a Comment

<< Home