November 30, 2009

आनंदवनभुवनी

गेल्या काही दिवसात
मी गाडी तिप्पट पळवली आहे

कार टेप बंद आहे बहुधा !
चालू असल्यास
त्यावर कोणती गाणी ऐकली ते आठवत नाहीये !

पुण्याला झोडपणारा अवकाळी पाऊस
मला चक्क आवडला आहे !!

जेवल्या जेवल्या,
काय खाल्लं,
ते आठवेनासं झालंय !

सकाळी उठल्या उठल्या
’सकाळ’च्या ऐवजी एस.एम.एस. पहायची सवय लागली आहे !

दाढी आठवड्यात एकदा करायच्या ऐवजी
रोज करणे तसे वाईट नाही असं वाटायला लागलंय !

दोन आठवड्यात
भलतीकडेच पाहून चालवताना
तीनदा गाडी धडकवली आहे

चक्क ’सगळी गाडी रंगवून घ्यावी का’ असा विचार मनात डोकावून गेला आहे !

वाहतुकीचे नियम मोडणा-या लोकांकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन मवाळ झाला आहे :)

रामानंदच्या ’अर्जंट’ परत करायच्या काही सी.डी.ज
मी निर्लज्जपणे एक आठवडा उशिराने दिल्या आहेत !

नेहमीच्या चिडक्या आणि रडक्या गोष्टी सोडून
काहीतरी छान लिहावसं वाटतंय :)

पामरा !!!

भावना कल्लोळल्या या आज का माझ्या मनी
कळेना काय रे होते ’आनंद’वनभुवनी

6 Comments:

Anonymous Anonymous उवाच ...

गेल्या काही दिवसात मी गाडी तिप्पट पळवली आहे
सकाळी उठल्या उठल्या ’सकाळ’च्या ऐवजी एस.एम.एस. पहायची सवय लागली आहे !

दाढी आठवड्यात एकदा करायच्या ऐवजी
रोज करणे तसे वाईट नाही असं वाटायला लागलंय !
>>>>>>>>>

सांभाळून हो. अशा अवस्थेत काळजी घ्यायला हवी. गाडी तिप्पट अंतर चालवावी लागत असेल तर जरूर चालवा. पण तिप्पट वेगानी नको, तर हळू हळू.

1.12.09  
Anonymous Anonymous उवाच ...

तुमच्या वयाच्या बर्‍याच स्त्रिया छान लिहितात, पण गडीमाणसांचा झेंडा फडकवत ठेवणारे तुम्ही बहुतेक एकटेच. ज़मल्यास जास्त नियमाने लिहित चला. आम्हाला तुमचे लिखाण आवडते.

2.12.09  
Blogger Mandar Joshi उवाच ...

I TAG you on my blog

27.12.09  
Anonymous Anonymous उवाच ...

abhinadan... :-)

12.1.10  
Blogger Prashant Kulkarni उवाच ...

जय जय रघुवीर समर्थ!!!!!!!!

22.2.10  
Blogger Anand Athavale उवाच ...

"Gift" chi Goshta chhan ahe. Pan baykone wachali tar majbut phatake padtil.

23.10.10  

Post a Comment

<< Home