December 17, 2004

VERITAS !!

एक अनामिक हुरहूर मनात दाटून आली आहे. लवकरच 'आडनाव' बदलून 'सासरी' जायचे आहे ! तसे स्थळ एक महिन्यापूर्वीच सांगून आले होते, पण 'देण्याघेण्याची बोलणी' चालू होती. मला कोणतीच कल्पना नव्हती ! दोन दिवसांपूर्वी कुणकुण लागली, आणि काल कळले की 'रिश्ता पक्का झाला' ! आता मनाची तयारी करत आहे !
फार कोड्यात टाकत नाही.

Symantec Corp. and VERITAS Software Corp. today announced a definitive agreement to merge in an all-stock transaction. The merger will lead to the creation of one of the world's largest software firms, which will trade under the name Symantec...

शेक्सपिअरने जरी म्हटले आहे "नावात काय आहे?", तरी नावात बरेच काही असते ! VERITAS या कंपनीला आणि नावाला माझ्या विश्वात खूप महत्त्वाचे स्थान आहे. आयुष्यातला पहिला वहिला जॉब ! माझ्या आयुष्यात एक प्रदीर्घ कालखंड असा होता, की जेव्हा घडणारी प्रत्येक गोष्ट विरुद्धच जात होती. फसवणूक, अपमान, अन्यायाविरुद्धची चीड, संताप, असहायता, वैफल्य, अपेक्षाभंग, नैराश्य यांच्या वावटळीत मी सापडलो होतो. या कालावधीत मनाला आनंद वाटावा अशी घडलेली एकमेव गोष्ट म्हणजे माझी कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये VERITAS मध्ये झालेली निवड... Joining Date ची मी अगदी चातकासारखी आतुरतेने वाट पाहत होतो. पुणे युनिव्हर्सिटीच्या Computer Engg नामक यमपुरीतील नरकयातनांपासून सुटून आपण केव्हा एकदा ही नोकरी सुरू करतो असे वाटत होते...

नव्या कंपनीत रुळायला थोडा वेळ लागला. नवे ऑफिस, नवे सोबती, नवे काम. मी ज्या सुमारास join झालो, तो मोठा 'कठिण समय' होता ! अवास्तव कल्पनांचा फुगा टाचणी लागून फुटल्यावर 'IT' ला एक जबरदस्त झटका बसला होता. आजूबाजूला ले ऑफ, पगार कपात, कंपन्या बंद पडणं हेच ऐकू येत होतं. काम करताना मनावर एक दडपण असायचं. पण हळूहळू परिस्थितीत सुधारणा होत गेली. साडेतीन वर्षांत मी पक्का 'Veritian' बनलो. हसत-खेळत कामात काळ कसा लोटला ते कळलंच नाही !

आता कंपनीचं नाव बदलेल. इतरही काही गोष्टी बदलतील.
माझ्या मनाचा 'VERITAS' साठी राखून ठेवलेला एक कोपरा मात्र तसाच राहील.

3 Comments:

Blogger Pooja उवाच ...

Hmm, isn't it similar for COEP?

But of course, aplyala Sasari nahi zawa lagla, ani kay farak padhu shaktho nahi zaanwaawa lagala :)

20.12.04  
Blogger Neeraj Bhatia उवाच ...

Nikhil, I just read some of your posts. Really enjoyed the appraisal one and this one about the merger. Keep it up.

30.5.05  
Anonymous Anonymous उवाच ...

''CHHAN AAHE! KEEP IT UP...!!''
RISHIKESH CHINDARKAR, MUMBAI
9869443092

19.2.06  

Post a Comment

<< Home