November 2, 2004

'प्रकल्प वर्षा' च्या तयारीला लागा !

'प्रकल्प वर्षा' ! हे नाव ऐकलं आहे, पण काय ते आठवत नाही ! सांगतो. या वर्षी महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला ना, त्या project चे हे नाव होते. प्रयोग तसा यशस्वी झाला. पण तुम्ही म्हणाल , आता तर दिवाळी आली, आता पाऊस कसला पाडता ! तसा मधे विधानसभा निवडणुका आल्यामुळे आश्वासनांचा भरपूर पाऊस पडला की ! अहो, 'त' म्हणता 'ताकभात' ओळखणारे तुम्ही, अजून ओळखलं नाहीत ?
थोडी hint देऊ काय ?
अहो, आता भारत-ऑस्ट्रेलिया मुंबई कसोटी जवळ आली आहे. एक दोन दिवस राग-रंग पाहू, नाहीतर सरळ कृत्रिम पाऊस ! आपल्या संघाच्या पाठीशी आपण नाही तर दुसरं कोण उभे राहणार आहे ? आणि बरं का , आपण बेंबीच्या देठापासून ओरडून जगाला सांगितले - "मद्रास कसोटीत पाऊस आला हो , नाहीतर...", या वाक्याचा पुढला अर्धा भाग जो आहे, त्याला मराठीत म्हणतात : "झाकली मूठ सव्वा लाखाची" !