Walking in rain
मी पापण्या मिटून घेतल्या आहेत.
मी एका कड्याच्या टोकाला एका भिजल्या कातळावर विसावलोय... दरीतून धुकं वर येतंय. पूर्वेला क्षितिजावर तांबडं फुटतंय. दरीत ओघळणा-या कोवळ्या सोनेरी किरणांना धुक्याचा पदर छेदून जायची इच्छा नाहीये. पावसाची हलकी सर आसमंत ओला करून सोडतीये. थंड वारा अंगावर शिरशिरी उठवतोय ! झाडाचं पान अन् पान, गवताचं पातं अन् पातं ओलं झालंय; माझं मनही ! हिरवा वास मनात अतृप्तीचे तरंग उमटवतोय.
जणू सारी सृष्टी 'त्याची' अर्चना करत आहे. पर्जन्यधारा स्नान घालताहेत, धुकं नव्हे - हा उदबत्तीचा धूर आहे, प्राची नव्हे - हा समईचा प्रकाश दिशा उजळत आहे, ल्यायला हिरवी वसनं आहेत... पूजा करणारा, पुजला जाणारा आणि ही अलौकिक पूजा पाहणारा - सारे वितळून, मिसळून गेले आहेत...
अ हं...
हा पावसाळा नाहीये.
मी पर्यटन स्थळास भेट देत नाहीये.
बाहेर एप्रिल चे ऊन मी म्हणत आहे.
मी माझ्या ऑफिस मध्ये कंप्यूटर समोर बसलो आहे.
पण...
कानावर हेडफोन आहे,
पं. शिव कुमार शर्मांच्या 'Walking in rain' या रचनेनं मनावर गारूड केलं आहे...