September 16, 2013

कोरा कागद निळी शाई

पिल्लाचा डायपर बदलताना त्याचं मन रिझवायला मी एक विडंबन बडबडगीत म्हणतो- 


ओला डायपर निळी शाई * 
आम्ही कुणाला भीत नाई 
शी शी केली अस्से / नस्से 
रडी ची बात नस्से 
रडलं तर सात औंस ** प्यावे लागतील. 
रेडी ssss  का  ssss ?


रुमाल पाणी च्या खेळात  'राज्य योग' आल्यावर सह्या करायचा हा करार ज्याने कोणी लिहिला त्याचे कौतुक आणि आभार!

जाता जाता आठवलं : 'जास्तीची मेजॉ sss र्टी ' !! 

* Pampers च्या डायपरचा निळा वेटनेस इंडिकेटर
** ७ औंस दूध!!