July 3, 2006

आनंदे नटली !

वृक्षांकडे पहा
गगनभरारी घेणा-या विहंगांकडे पहा
नभ आच्छादणा-या मेघांकडे पहा
अनंताच्या पोकळीत डोळे मिचकविणा-या ता-यांकडे पहा...

आणि जर तुम्हाला 'दृष्टी' असेल
तर तुम्हाला दिसेल
की या सा-यांचं आस्तित्वच आनंदमय आहे
प्रत्येकजण केवळ आनंदी आहे !

खरंतर वृक्षांना आनंदी असण्याचं कोणतं कारण आहे ?
ते ना पंतप्रधान बनणारेत, ना राष्ट्रपती
ना ते कधी श्रीमंत होणार आहेत
ना त्यांच्या गाठीशी कधी पुंजी साठणार आहे !

तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत,
पण ही उमललेली फुलं आनंदी आहेत.
खूप खूप आनंदी आहेत...

(स्वैर अनुवाद)
---
पांचगणीच्या ’शेरबागे’मध्ये वाचलेल्या या कवितेचा मी अनुवाद करण्याचा प्रयत्न केला होता. ती मूळ कविता आज येथे अपलोड करायला मुहूर्त सापडला !
७ सप्टेंबर ०९