August 21, 2006

शहनाई बजे ना बजे

एक पिकलं पान काल अलगद गळून पडलं...

'पूजेतल्या पाना फुला
मृत्यू सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा' असं सारं आयुष्य संगीत साधनेत समर्पित करून आता निर्माल्य झालेल्या उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन..

कठोर तप:श्चर्येच्या बळावर खॉं साहेब शहनाईचा जणू मानवी चेहराच बनले. जसं प्रत्येक धार्मिक कार्यात पूजारंभी विघ्नहर्त्याची पूजा असतेच, तशी मंगल सुरांची उधळण करायला खॉं साहेबांची सनई हाही येथला दंडक बनला ! स्वतंत्र वादनाबरोबरच खॉं साहेबांची सतार आणि व्हायोलिन बरोबरची जुगलबंदी रसिकांची मनं जिंकून गेली.

भारतरत्न आणि पद्म पुरस्कारांची शान वाढवणारा हा संगीततपस्वी आज जरी आपल्यात नसला तरी त्यांनी निर्मिलेले सूर मात्र कानात कायमच रूंजी घालत राहतील...