November 30, 2009

आनंदवनभुवनी

गेल्या काही दिवसात
मी गाडी तिप्पट पळवली आहे

कार टेप बंद आहे बहुधा !
चालू असल्यास
त्यावर कोणती गाणी ऐकली ते आठवत नाहीये !

पुण्याला झोडपणारा अवकाळी पाऊस
मला चक्क आवडला आहे !!

जेवल्या जेवल्या,
काय खाल्लं,
ते आठवेनासं झालंय !

सकाळी उठल्या उठल्या
’सकाळ’च्या ऐवजी एस.एम.एस. पहायची सवय लागली आहे !

दाढी आठवड्यात एकदा करायच्या ऐवजी
रोज करणे तसे वाईट नाही असं वाटायला लागलंय !

दोन आठवड्यात
भलतीकडेच पाहून चालवताना
तीनदा गाडी धडकवली आहे

चक्क ’सगळी गाडी रंगवून घ्यावी का’ असा विचार मनात डोकावून गेला आहे !

वाहतुकीचे नियम मोडणा-या लोकांकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन मवाळ झाला आहे :)

रामानंदच्या ’अर्जंट’ परत करायच्या काही सी.डी.ज
मी निर्लज्जपणे एक आठवडा उशिराने दिल्या आहेत !

नेहमीच्या चिडक्या आणि रडक्या गोष्टी सोडून
काहीतरी छान लिहावसं वाटतंय :)

पामरा !!!

भावना कल्लोळल्या या आज का माझ्या मनी
कळेना काय रे होते ’आनंद’वनभुवनी