A Celestial Appraisal !!
परब्रह्म : प्रथम आपण या Appraisal Period मधले गोल्स डिस्कस करू. मग जर तुला काही issues असतील तर त्यावर चर्चा करू. आणि मग पुढल्या Appraisal Period साठी गोल्स डिफाईन करू. ओके ?
विष्णु : ओके !
परब्रह्म : Overall Performance चांगला आहे. जग चालण्यासाठी जे भले बुरे घटक लागतात त्यांचा (im)balance चांगला आहे. सहिष्णु आणि असहिष्णु लोक आहेत, पैसा आणि गरिबी आहे. अनाचार करणारे लोक पण आहेत, आणि हल्ली बरेच नवे नवे धार्मिक पंथ पण उदयास येत आहेत. हे झाले Positive Factors.
थोडी सुधारणा पण हवी आहे. काहीतरी नवा initiative घेतला पाहिजे. सध्या जे चालू आहे ते सगळे जवळपास पूर्वीच्या मन्वंतरांत होऊन गेलेले आहे. 'परशुराम' हा जसा नवा initiative या मन्वंतरात घेतला, तसा पुन्हा घ्यायला पाहिजे.
विष्णु : ओके !
परब्रह्म : आता तुझा फीडबॅक...
विष्णु : बरंच काही आहे...मी कामावर फारसा काही खूष नाहीये. Just maintenance work :(
तो ब्रह्मा पहा - एकदा जग निर्माण करायचं आणि मग Founder Architect म्हणून आयुष्यभर मिरवायचं. ते R & D चे लोक ना. आमची इथे वाट लागत आहे maintenance मधे.
परब्रह्म : See... तोच चॅलेंज आहे कामातला. ब्रह्मा ने जग बनवलं असेल, पण आता त्याला ग्रोथ नाहीये. फारसा Improvement चा स्कोप नाही.तुझ्या कामाला एक्स्पोजर आहे, ग्लॅमर आहे. आता पृथ्वीवर बघ किती देवळे आहेत तुझी, केवढे तरी भक्त आहेत. झाल्यास तर Frequent Travel Opportunity आहे.
विष्णु : पृथ्वीला ट्रॅव्हल काय करायचाय ! नुस्ता त्रास असतो. खस्ता खायच्या, प्रोजेक्ट क्रायसिस मधून बाहेर काढायची, आणि वरतून काय ? हे पृथ्वीवरचे डेव्हलपर दीडशहाणे ! माझ्याच चुका काढतात. म्हणे सीतेला का टाकली आणि बळीला पाताळात का ढकलले. भक्त आहेत त्यातले सुद्धा नव्वद टक्के लोक स्वत:ला फायदा व्हावा म्हणून चाटूगिरी करत असतात.
शेवटचा मुद्दा - इथे आता मला करिअर पाथ काय आहे ? मी विष्णु तर Already आहेच. पुढे काय ? अन्यथा मी दुस-या ब्रह्मांडात ब्रह्माच्या Position साठी Switch मारीन.
परब्रह्म : See... ग्रोथ म्हणजे केवळ प्रमोशन नाही. तुझे 'जग' या डोमेन चे कौशल्य वाढत आहे. अजून कल्की अवतार आहे. आजवर जग तुम्ही काही नियमांनी चालवले. जसे, प्रत्येक जीवजातीची संख्या नियंत्रण करायला तुम्ही 'जीवो जीवस्य जीवनम्' हे technique वापरता. Think of some new technology... Some revolutionary thought ... Thats the growth... मी just pointers देत आहे...
विष्णु : ठीक आहे. विचार करतो.
परब्रह्म : Good luck, for next appraisal period !