August 22, 2009

गणपतीची आरती

समर्थ रामदास स्वामी रचित गणपतीची आरती



सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।

सर्वांगी सुंदर उटी शेंदूराची ।

कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥ १ ॥



जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मन:कामना पुरती ॥ ध्रु. ॥



रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।

चंदनाची उटी कंकुमकेशरा ।

हिरेजडित मुगुट शोभतो बरा ।

रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥ २ ॥



जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मन:कामना पुरती ॥ ध्रु. ॥



लंबोदर पीतांबर फणिवर बंधना ।

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।

दास रामाचा वाट पाहे सदना ।

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥



जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मन:कामना पुरती ॥ ध्रु. ॥

August 16, 2009

कृतज्ञता !

पुण्यात स्वाईन फ्लू ने धुमाकूळ घातला आहे. अनेक लोकांनी घरीच राहणे पसंत केलं आहे. शाळा, महाविद्यालयं, सिनेमागृहं, होटेल्स, बाजार बंद आहेत - जणू स्वयंघोषित संचारबंदीच आहे !

पण याच वेळी काही हात स्वाईन फ्लू ला प्रतिबंध करायला झटत आहेत. डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयांतील कर्मचारी, तपासणी केंद्रे, एन आय व्ही आणि इतर अनेक घटक. त्यांचे आभार मानावेत तितके कमीच आहेत. त्यांच्या प्रती मनात कौतुक आणि कृतज्ञता याच भावना आहेत !